मनातला जिवलगा
मनातला जिवलगा
श्वास माझे जणू तुझीच स्पंदने
साद माझी जणू तुझीच पाऊले
अंतरंगात ह्या उमलता कळी
गंध प्रेमाचा दरवळे तुझ्या ओंजळी..
आज चंद्रासही सूर्य हा स्पर्शतो
चांदण्यांचा सडा ऊन्हातही बरसतो
तार ह्रदयातली तू अशी छेडिता
सूर कंठातला काळजा छेदतो..
तूच काव्यातला तूच मौनातला
जिवलगा जिवलगा
गीत लिहिण्यासही शब्द दे तू मला
जाणिवेतूनी भावनांच्या उमलू दे मला
अबोल नात्यातला बंध हा बोलतो
जेव्हा मनाचा लख्ख आरसा आठवांनी उजळतो..
चांदण्या रात्रीला असते सर्वांची साथ
हात असावा तुझ्या हाती प्रत्येक जन्मात
तार ह्रदयातली तू अशी छेडिता
प्रेम गीतातूनी शब्द हा वाहतो..
रूतु हा कोवळ्या ऊन्हाचा
सजे सोहळा अंतरी प्रेमाचा
कालही तूच अन् आजही तूच रे
जिवलगा जिवलगा..
आसही तूच अन् ध्यासही तूच
जिवलगा जिवलगा...

