STORYMIRROR

Shilpa Dange

Romance

3  

Shilpa Dange

Romance

तुझी साथ

तुझी साथ

1 min
259

नको ऊन वारे

ऋतुंचे पहारे/निखारे

जिथे मी हसावे तिथे तू असावे

तुझ्या आठवांनी मी बेधूंद व्हावे

नजरेत तुझिया हरवून जावे

जिथे वाटते आकाश संपलेले

तिथे तू पंख होशील का?

जिथे वाट ही लांब जाते जराशी

तिथे तू सोबती होशील ना

जिथे वाटतो तोल जातो जरासा

तिथे हात हाती तू देशील ना

जिथे मिळे धरेला आभाळ दाटलेले

जिथे अंधारात रंग क्षितिजाचे बुडालेले

त्या अंधारलेल्या क्षणांना

तू दीप होशील ना

त्या अधुर्‍या क्षणी अव्यक्त संवेदनांची

अलवार ती फुंकर होशील ना

मला साथ देशील ना..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance