STORYMIRROR

Shilpa Dange

Romance Fantasy

3  

Shilpa Dange

Romance Fantasy

मी आणि तू

मी आणि तू

1 min
343

मी निखळ हसणारी एक चांदणी,

अन् तू मला सावरणारा एक तारा ....

मी पावसाच्या पहिल्या सरीचा थेंब,

अन् तू कातरवेळचा गार वारा ....

मी....

सोनेरी संध्याकाळ काळोखात पहूडलेली,

अन् तू माझ्यात विरघळणारा सूर्यप्रकाश हुरहुरलेला....

मी लाट किना-याजवळ घुटमळणारी,

अन् तू सागर मला सतत झेलणारा

मी....

सावली उन्हामधली तुला बिलगून चालणारी

अन् तू एक उनाड ढग मला दडवणारा

मी एक कोवळी कळी

अन् तू शांत वारा सर्वत्र दरवळणारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance