Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shilpa Dange

Others

3  

Shilpa Dange

Others

हिशोब

हिशोब

1 min
289


हिशोब नाही करता येत हो

आपण घेत असलेल्या असंख्य श्वासांचा

अन् जगलेल्या अनमोल क्षणांचा

फुलांमधून दरवळणार्‍या सुगंधाचा

अन् त्या रणरणत्या ऊन्हातील

वार्‍याच्या झुळूकांचा

हिशोब नाही करता येत हो

सूर्याच्या सोनेरी किरणांचा

अन् सागर किनार्‍याला धडकणार्‍या

त्या लाटांचा

दिवसांमागून येणार्‍या अंधारलेल्या रातींचा

अन् चंद्राच्या शितल छायेचा


हिशोब नाही करता येत हो

वृक्षांकडून ऊन्हात मिळणार्‍या सावल्यांचा

अन् त्या झाडांच्या पानगळीत गळणार्‍या पानांचा

नदीच्या त्या संथ प्रवाहातील लहरींचा

अन् तिच्यात विरघळणार्‍या असंख्य झर्‍यांचा


हिशोब नाही करता येत हो

आपल्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या प्रार्थनांचा

अन् त्यांनीच केलेल्या असंख्य त्यागांचा

आपल्यासाठी कुणीतरी वाहिलेल्या अश्रूंचा

अन् आपल्यावर निर्व्याज मनाने केलेल्या अतुट प्रेमाचा


हिशोब नाही करता येत हो

आईने जन्माच्या वेळी सहन केलेल्या प्रसववेदनांचा

अन् तिच्या अमर्याद मायेच्या ओलाव्याचा

बांबांनी आपल्यासाठी घेतलेल्या अमाप कष्टांचा

अन् त्यांनी क्षमा केलेल्या असंख्य चुकांचा


हिशोब नाही करता येत हो

कुणीतरी आपल्यासाठी नकळत सहन केलेल्या अपमानांचा

अन् दिलेल्या आनंदी क्षणांचा

कुणीतरी आपल्यासाठी वाहिलेल्या अश्रूंचा

अन् सहन केलेल्या वेदनांचा..


हिशोब नाही करता येत हो

आपल्या मनातल्या भावनांना जपणार्‍या नात्यांच्या आपुलकीचा

अन् कुणीतरी जिंकत असूनही आपल्यासाठी हरलेल्या क्षणांचा

आपल्या माणसांमुळे मिळालेल्या सुखांचा

अन् आपल्या सुखासाठी त्यांनी मारलेल्या ईच्छांचा


हिशोब नाही करता येत हो

आयुष्याने पूर्ण केलेल्या अपेक्षांचा

अन् दिलेल्या सोनेरी आठवणींचा

जगतांना होणार्‍या ह्रदयातील स्पंदनांचा

मनात सतत रेंगाळणार्‍या शब्दांचा

हिशोब नाही करता येत हो

त्या दु:खात होरपळून टाकणार्‍या जाणीवांचा...


Rate this content
Log in