लेक
लेक
1 min
355
तुझ्या ईवल्याशा बंद मुठीत
माझ्या जगण्याचं सार
तुला पाहून हलका होतो
माझ्या मनावरचा भार
तुझ्या गालांवरची खळी
आणि हसण्याचा गोडवा
खळखळत राहो असाच
जसा आभाळातला पारवा
तुझ्या नाजूक पावलांनी
चालाव्या रंगबिरंगी वाटा
तुझं बहरणं पाहून लहराव्या
तुझ्या असण्याच्या लाटा
माझ्याजवळ तुला देण्यासाठी
आहे प्रेम फक्त
माझी आठवण म्हणून
तुझ्यासाठी दारी लावेन मी प्राजक्त
जगासाठी असतील गरजे पुरती
नाती अनेक
पण माझ्या जगण्याला सुंदर अर्थ
देणारं नातं फक्त मायलेक
