STORYMIRROR

Shilpa Dange

Others

3  

Shilpa Dange

Others

आयुष्य भरभरून जगायचंय मला..

आयुष्य भरभरून जगायचंय मला..

1 min
370

चांगल-वाईट यांच्या पलीकडचं

आयुष्य जगायचंय मला

लोक काय म्हणतील?

कोणाला आवडेल न आवडेल

यांचा विचारच नकोय

मनासारखं जगायचंय मला

याने काय दिलं ,त्याने काय घेतलं

हा लहान तो मोठा

यातून बाहेर पडायचंय मला

कधी वाळूवर उमटवलेल्या पावलांना

पुसणार्‍या समुद्राच्या लाटांना रोकायचंय मला

तर कधी हवेत बलून/पतंग सोडून

त्यांच्यामागे उंच उडायचंय मला

खरं -खोट्याच्या कायद्या पलिकडचं

जग शोधायचंय मला

असेना कुणी खरा, कुणी खोटा

तरी सगळ्यांना स्वीकारून

आपलं म्हणायचंय मला

कारण आपल्याच माणसांनी

तसं बनवलंय त्याला

वास्तव आणि कल्पना

यांच्या पलिकडे जायचंय मला

ऊन्हातही चांदण्यांचे सडे

अन् क्षितिजा पल्याडचं जग

शुन्यात बघायचंय मला

हे नको करू ते तिच्यासारखं कर

हे ऐकायचंच नाहीय मला

कशाचीच पर्वा न करता

एकदाच मिळालेलं god gifted

आयुष्य भरभरून जगायचंय मला..


Rate this content
Log in