सरी
सरी
मेघ गर्जना करी
बरसल्या पावसाच्या सरी
तृष्णा माझ्या मनीची
न शमली परी
इथे शब्दही बरसतात
होऊनी काव्यरसाच्या धारा
मग का मनी माझ्या
दाटला आठवणीचा पसारा
जलद इथे धावतात
झाकोळलेल्या आकाशात
जणू लपंडावच खेळतात
या सूर्याच्या प्रकशात
सरीवर सरी येतात
वर्षागीत गातात
जडावलेल्या मनाला
फुलपाखराचे पंख देतात
कधीतरी ये भेटायला
तू पाऊस होऊन
दूर क्षितिजापलीकडे
जा ना मला घेऊन