स्वातंत्र्यदिन
स्वातंत्र्यदिन
कसा डौलाने फडके
ध्वज आमुचा तिरंगा
गाथा स्वातंत्र्याची गाण्या
प्रगटली स्वरगंगा
मिळविण्या स्वातंत्र्य हे
प्राणांची आहुती दिली
जालियनवाला बागेत
नदी रक्ताची वाहिली
भगतसिंग,सुखदेव
अमर हुतात्मे झाले
स्वराज्य मिळविण्यास
फासावर लटकले
आपल्यापरीने लढले
जहाल मवाळ पक्ष
स्वातंत्र्याच्या या लढ्यात
पुत्र गमावले लक्ष
इतिहास स्वातंत्र्याचा
कधीच ना विसरावा
शहिदांच्या या त्यागाचा
पोवाडा रोज स्मरावा
