STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Tragedy

3  

Snehlata Subhas Patil

Tragedy

महापूर

महापूर

1 min
237

संकटांची ही मालिका

कधी होणार रे दूर

विधात्या कशाला पुन्हा

धाडलास महापूर


थांबता थांबेचना हा

कृष्णामाईचा रे क्रोध

अजूनही घेत आहोत

पोराबाळांचा रे शोध


होत्याचं नव्हतं झालं

सगळंच गेलं वाहून

तू ही रडला असशील

माझी दुर्दशा पाहून


आधीच या कोरोनाने

नातलग झाले पारखे

या महापुरात जगतोय

बेघर आश्रीतासारखे


अजूनही आहेस तू

गेलास दाखला देऊन

वाचविण्या बुडत्याला

आला देवदूत होऊन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy