STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Classics

4  

Snehlata Subhas Patil

Classics

श्रावणमास

श्रावणमास

1 min
175

रम्य या श्रावणमासी

हिरवळ दाटे चोहिकडे

स्वर्गाच्या या अवनीवरती

मोतीयांचे पडती सडे


वसुंधरा ही नटली माझी

खळखळ करती शुभ्र झरे

हिरवाईचा शालू नेसून

नववधू्च ही अवनी स्मरे


ढगांचा हा मांडव सजला

हरिततृनाच्या माखमालीवर

सुंदर फुलांची नक्षी साजे

या वसुंधरेच्या शालीवर


इंद्रधनुचे तोरण बांधले

अंबराच्या या दाराला

फुलांचाही गोफ विणला

सुगंध आला आत्तराला


वरुणराजाची स्वारी आली

लगबग झाली अवनीची

खग है गाती मंगलगाणी

वेळ झाली पाठवणीची


चंद्राच्या या रथात बसून

निघाली अवनी सासरला

दिल्या घरी तू सुखी रहा

विसर आता ग माहेरला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics