STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Others

4  

Snehlata Subhas Patil

Others

माहेर

माहेर

1 min
464

धागा धागा गुंफुनी ग

घर प्रेमाचे बांधते

देण्या लेकीला माहेर

आई सासरी नांदते


परी लाडकी बाबांची

जणू मधुर बासरी

होते सौभाग्यकांक्षिनी

जाते निघून सासरी


नवी नाती नवे घर

त्यात सामाऊनी जाते

नाते निभावून नेता

स्वतःलाच विसरते


माहेरच्या माणसांचा

हळूहळू तुटे पाश

सासरच्या माणसात

शोधे प्रेमळ विश्वास


सासरच आहे स्त्रीचा

आता कायमचा पत्ता

नाही माहेरात आता

तिची कसलीच सत्ता


नवा जन्म होतो तिचा

जेव्हा जाते सासरला

विसरुनी जुने पाश

पूर मनी ओसरला


Rate this content
Log in