चंद्रकोर
चंद्रकोर
तेजळण्या तीमिरास
निघाली ही चकोर
सागराच्या भाळावरती
शोभते ही चंद्रकोर
सुंदर है रूप तिचे
खुलून आले सौंदर्य
तीमिराला प्रकाशण्याचे
दाखविते ती औदार्य
उफाळल्या सागरलाटा
तरंग जलदांवरती
शीतल चंद्रप्रकाशात
मोहरली ही धरती
पाहुनी मोहक रुप तिचे
मती सागराची भांबावली
त्या सागराच्या भेटीसाठी
चंद्रकोर ती वेडवली