STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Classics

4  

Snehlata Subhas Patil

Classics

तो पाऊस अन् ती

तो पाऊस अन् ती

1 min
236

पाऊस तो अन्

ती वेडी अवनी

जणू आतुरलेली

अधीर सजनी


थकले डोळे तिचे

वाट त्याची पाहून

आठवांचे कढ येती

मनाचे बंध तोडून


दिली होती वचने

मनाच्या बद्धतेची

कितीही गेले उन्हाळे

तरी वर्षेत बरसण्याची


आज तो बरसला

होऊनी रे बेभान

अवनीचाही आज

वाढला होता मान


संपलेच आता हे

गहिरे क्षण विरहाचे

रमणीय दृश्य पाहा

अवनी वरुण मिलनाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics