STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Others

3  

Snehlata Subhas Patil

Others

खट्याळ पाऊस

खट्याळ पाऊस

1 min
268

पावसा पावसा

तू असा रे कसा

खट्याळ चंचल

चितचोर जसा

    खेळतोस खेळ

    नेहमीच असा

    ऊन सावलीचा

    लपंडाव जसा

नेहमीच का रे

बरसतो असा

पृथ्वी मिलनास

अधिरच जसा

     क्षणात दिसतो

     क्षणात नसतो

     फसवूनी मज

     गालात हसतो

सरीवर सरी

शिडकावा करी

मधेच उन्हाची

लकेर अंबरी

     रंगात प्रितीच्या

      रंगवूनी असा

      हळूच बाजूला

     होतोस रे कसा


साहित्याला गुण द्या
लॉग इन