दुर्बलमन-कवी-संजय रघुनाथ सोनवण
दुर्बलमन-कवी-संजय रघुनाथ सोनवण
मन दुर्बल, दुर्बल
त्याला लाभे भोंदूचे बल
खोट्या मंत्रांचा भडीमार
नाही काडीचा आधार
भोंदूनचा वाढला व्यापार
अंध भक्त खरेदीदार
महीमा गाती त्यांचा थोर
झाला दुबळा संसार
दुर्बल मन झाले श्रद्धावान
भोंदू होती अफाट धनवान
वास्तवाचे भान विसरून
करतात त्यांचे गुणगान
सत्याचे नाही आचरण
देवताना साक्षी ठेवून
अंगात आणती देवपण
ठकवितात सकळ जन
अंधभक्त घालती लोटांगण
भस्म विभूतीचे आवपण
फसतात स्वतः जाऊन
येतात रुपये देऊन
आई बाप ईश्वर
हे केव्हा कळणार?
द्या दोन वेळची भाकर
सर्व सुखांचे आधार
शिक्षण असून, नको अज्ञान
विज्ञानाचे असावे भान
कान असून का बहिरेपन
शुद्ध ठेवा आचरण