आता उमजले मज सत्य
आता उमजले मज सत्य
आता उमजले मज सत्य
होतो दगडाचाच, डोक्यावर छतही नव्हतं
ख-या भक्तांमुळेच छत मला लाभलं होतं
सामान्य भक्तच मग अगरबत्ती लावू लागला
नारळ, फुलं, फळं व हारही देऊ लागला
हळू हळू तो मेहनतीचा पैसाही देऊ लागला
डोक्यावर छत मिळेल या आशेने येऊ लागला
पण माझं शरीर एकदमच चांदीचं झालं
त्याच्या भेटण्यावर मात्र मग बंधन आलं
चुकवलेला टॅक्स, लूटीचा पैसाही येऊ लागला
फुलं, फळं व हार सुद्धा सोन्याचा बनु लागला
तुमची घरं पत्र्याचीच किंवा मोडकळीला आली
माझे कळस, भिंती,आरासही सोन्
याची झाली
शरीर बघता बघता माझे सोन्याचे झाले
तुमच्या समस्या व अश्रू मला दिसेनासे झाले
पैसेवाल्यांच्याच नवसाला सतत पावलो मी
गरीबांना संकटातून तारणारा ऊरलो न मी
आता नुसता बसुन मला येऊ लागला आळस
स्वतःचीच स्वतःला आता वाटू लागली किळस
आता स्वरुप राहीलेच कुठे माझे देवाचे
त्याला आले मोल बाजारातील सोन्याचे
एक दिवस मग केले चोरानेही हात साफ
वितळवले मलाच ना केला माझा गुन्हा माफ
केव्हातरी ख-या भक्ताला पावले पाहीजे होते
त्याच्या कृपेनेच तर माझे चांगले चालले होते.