STORYMIRROR

Sunil Deokule

Others

2  

Sunil Deokule

Others

वसा

वसा

1 min
13.5K


घेतला वसा मी | जगाच्या शांतीचा|

जीव माणसाचा |वाचवाया||

केलाय मी प्रण |वापरा जपून|

पाणी हे जीवन |सांगावया ||

झाडे तुम्ही लावा|जग वाचायला|

हरित क्रांतीला |तारावया||

माणुसकी जाण|कर तू सज्ञान|

वाढविण्या मान |पामरा या ||

जगी नसे कोणी|अमर होऊनी|

राहील तरुनी|समजूया||


Rate this content
Log in