STORYMIRROR

Sunil Deokule

Action

2  

Sunil Deokule

Action

टोलमुक्त रस्ता

टोलमुक्त रस्ता

1 min
13.9K


नेत्यांची मुजोरी, टोल साहवेना

बंद करुनी देना देवा, बंद करुनी देना

घेती रोज रोख मोजूनी रासच ही पैशांची

तरी चोरट्यांच्या का रे भिती ही तोट्याची

सरावल्या हातांना ह्या कंप का सुटेना?

उजेडात घेती 'पांढरे' अंधारात 'काळे'

नेत्यांच्याच हाती आहे पापांचे हे जाळे

दुष्ट जनांकडूनी कधी ही जनसेवा घडेना

स्वार्थ जणु टोलवरची मिळकत ही सारी

आपुल्या कडूनच घेती आपुलीच सारी

घडोघडी अपघातांचा तोल सावरेना

माझ्या हाते देवा आता टोलनाके फुटावे

मुक्तपणे देणे माझे, माझेच मी लुटावे

मार्ग माझ्या प्रवासाचा, टोलमुक्त सापडेना

भल्यासाठी जनतेच्या बुरेपणा केला

खटले मी जिंकूनी रस्ता टोलमुक्त झाला

आपुल्याच रस्त्याला मी टोल ही भरेना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action