Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Action Inspirational

3.5  

Sarika Jinturkar

Action Inspirational

खरेदी

खरेदी

2 mins
303


माल, वस्तू व सेवा यांची पैशाच्या

 मोबदल्यात मालकी मिळवण्याची 

क्रिया म्हणजे खरेदी  

 सण समारंभ येती जेव्हा दारी 

सगळ्यांनाच खरेदीची असते हौस भारी  


सणासुदीचे दिवस चालूच असते 

दिवाळी,पाडवा म्हंटला कि 

उधाण येते आनंदाला

 नवीन वस्तू आणण्यासाठी 

 गृहिणी सह सर्वांनाच लागतात 

वेध वस्तू खरेदी करण्याला  

सध्याचा जमाना स्मार्टफोनचा 

हाय स्पीड इंटरनेट  


किमती पेक्षा कितीतरी कमी किमती

 एका क्लिकवर आवडेली वस्तू  

तुमच्या घरी पोहचविल्या जाते थेट  


 ऑनलाइन खरेदी लोकप्रिय 

होत असली तरी 

अनेक जणांना पारंपारिक 

दुकानामध्ये खरेदी 

करण्याकडे कल राही

 पण...दुकानातून खरेदी करायची विशेष मजा, निरखून पारखण्याची पात्रता 

आणि पैसा...वस्तू योग्य आहे की नाही आपल्या परवडत असेल आवडत असेल तर विशेष आनंद त्यात

 ऑनलाईन खरेदीत अशी गंमत येते तरी काय..? 


 आधुनिक तंत्रज्ञानाने पुसून टाकलेल्या भौगोलिक सीमारेषा स्पर्धात्मक किमतीला

वस्तू उपलब्ध करून देण्याच्या अस्तित्वात आलेली ही नवीन व्यवस्था ऑनलाईन खरेदीला

लोकांचा ना.. नाही पण अजूनही दिवाळीची खरेदी दुकानात गेल्याशिवाय पूर्ण होत नाही...


 ऑनलाईन खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या आकर्षक ऑफर्स भेटवस्तू या मोहामुळे 

अनेक जण करतात ऑनलाईन खरेदी..

पण जमलं तर पर्याय म्हणून द्या पसंती  


ऑनलाइन खरेदी करताना थेट घरी वस्तू आपण बोलावतो पण

काही गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यास तोटा ही आपल्यालाच उद्भवतो ...


 ऑनलाईन खरेदी ने इतर ऑनलाईन सोयी प्रमाणे बऱ्याच गोष्टी सोप्या केल्या


पण विश्वास हर्ता संपादन करण्यास अजूनही काही अपयशी ठरल्या.. ?


करायचीच असेल ऑनलाईन खरेदी तर कॅश ऑन डिलिव्हरी चा पर्याय योग्य..

 फसवणुकी पासून वाचवण्यासाठी हाच राहील चांगला मार्ग...  


पण पटत असेल ना.. अन् 

 जमत असेल ना 

तर दुकानातूनच खरेदी करा  

त्यातल्या त्यात

गरजू आणि गरीब व्यक्तीकडून 

एखादी वस्तू खरेदी करा !

त्यांच्या चेहरावरचा आनंद व समाधान तर कधीतरी बघा

पण कधी करू नका वस्तू घेतांना घासाघीस

अविरत कष्ट करून त्यांचा जीव आधिच 

झाला असतो कासावीस


थकलेल्या हाताने थाटले असते दुकान 

हस्तकला आपली बहरून येण्यासाठी

 रस्ता वरच मांडतात दुकान 

 पण बाहेरच्या झगमगाटीत आपण लोक

 गुंग झाली आहोत आज

 नाही देत गरिबांच्या त्या 

वस्तूला योग्य भाव  

कंपनीच्या लेबलाला किमंत 

 कधी विचारता येते का राव ..?


गरिबाला ही वाटते मेहनतीचे 

दोन पैसे मिळावे 

नाही ताकत त्यांची 

कशे हे विदेशी थांबवावे

 बघा विचार करून

खरेदी करा वस्तू दुकानातून, 

कधी चालत्या वाटेवरुन

 तेही करतील मग सणवार

 दोन पैसे मिळाले त्यांना तर होईल 

डोक्यावरचा कमी भार....बरोबर ना..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action