किती धावशील मना
किती धावशील मना
हाव अंतरी दाटला
अर्थ सुखाचा कळेना
जगी कोण सर्व सुखी
अंत स्वप्नांचा होईना
सुख भासते अपुरे
गेली बदलूनी नीती
धन सर्वस्व तुजला
व्यर्थ तुझी ज्ञानज्योती
घाल आवर मनाला
काय हवे जगण्याला
शोध तुझ्या अंतरी
मोक्ष मिळे आत्म्याला
कुठे जाशील विश्वात
चोहिकडे एक धरा
थोडा घालून आवर
अरे वेड्या थांब जरा
कुणा चुकला येथे
जन्ममरणाचा फेरा
कधी उषा कधी निशा
श्वास साऱ्यांचा उपरा
कधी थांबशील मना
कुठे थांबशील मना
ध्यास सुखाचा सरेना
किती धावशील मना
