काळ सरकतो पुढे
काळ सरकतो पुढे
काळ सरकतो पुढे
त्याच्या सोबती चालावे
शेष पाठीस अंधार
मार्ग पुढचे शोधावे
द्यावी मनाला उसंत
छळतात प्रश्नोत्तरे
हाती उरतात अरे
वेदनांची गुणोत्तरे
नको माणसा धावूस
भास आभासांच्या मागे
भावनांचा लागे ठेच
खेळ नशिबाचा चाले
झाले गेले विसरून
जीवनाचे गीत गावे
चिंता सोडूनी उद्याची
आज या घडीला जपावे
