जडण घडण
जडण घडण
नजरेचा खेळ मी मनाशी मांडत होतो
की शिकर्याच्या हातुन सुटाव तीर
तोच हरणीच्या चाली जीवनाशी लढत होतो
काही केल्या संपेना दारिद्य्र चा काळ
उडान घेण्या भरारी आडवा तोच माळ
दगड गोटया वानी वरसाने वर्ष खेट्टत होतो
बालपण गेलं एका समाधानात
नजर लागली त्या आनंदवनात
स्वप्नात त्या बालपणा पुन्हा भेटत होतो
मिळाली बरेच अपयशाची साथी
न हरून मी वाद घातला दिसराती
विझलेल्या वातीला जसे पेटवावे पुन्हा पेटत होतो
आज नजरेचे पंख नव्याने दिशा शोधत होती
दिशाहीन व्हावा हरीण तोच शिकारी क्रोधुन जाती
तु चाल पुढं वेड्या म्हणाला काळे दिस ते लोटत होतो...
