होय ना...
होय ना...
पहिल्या प्रेमाची पहिली भेट
पहिल्या नजरेतला तो हळुवार पणा
ती गालावरच्या स्मित हास्याची झलक,
आणि कातरत बोललेले बोबडे शब्द
समजले नाही परंतु आयुष्याच सर्वस्व.
असच काही होय ना...
शब्दाचं गणित तोल मोल
यात काही गफलत वाटली नाही,
कारण जुळवा जुळव चालू होती
बेरीज, वजाबाकी,गुणकार,भागाकार
सूत्र मात्र अलगद सुटत होते.
असच काही होय ना...
फांदीवर बसलेल्या दोन पाखराचं
स्वप्न खुल्या नभात रंगत होत,
पडणाऱ्या पावसाच्या थेंबात,
सकाळच्या धुक्यात पाहावं,
स्वर्गाच दार उघडावं.
असच काही होय ना...
अधोरेखित........?
श्रीकांत वाघमारे सिरसमकर....

