STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Children Stories Inspirational Others

3  

Shrikant Mariba Waghmare

Children Stories Inspirational Others

सोहळा!

सोहळा!

1 min
258

नातं कोणतंही असो त्यात जिव्हाळा हवा

सख्खा, चुलत किवा परका

मानणारा प्रत्येकाचा ठरलेला मतभेद

सारून वैर बाजूला नात्यात एक प्रितीचा लळा हवा !!

आयुष्य आनंदी ठेवायचे असेल

तर #वाद_अन_संवाद या दोन्ही गोष्टी गरजेच्याच..... 

वाद_सोडला संबधाला जिव्हाळयात आपुलकीत जोडणे सोयीचे.......

नि संवाद_जोडला ...

तर #मुक्या_भावना_शब्दबध्द होऊन

नात्यातील जीवन सफल करते !!

मायेच पांघरन उबेपुरत

छायेची साऊली उन्हापुरती

कामापुरते मामा नको आता

जीवाला जीव लावणारा श्वास मोकळा हवा !!

गावभर नक्कल करायलाही

गारुडी आपली सर्कस दाखवतात

जपलेले धष्टपुष्ट नकली चेहरे

दुःखाच्या खाईत साथ सोडतात

पाण्यावर लोणी नको सवगंडी भोळा हवा !!


छोट्याशा आयुष्यात आनंद शोधन

प्रत्येकालाच जमलच का ?

सुखाच्या उंबरठ्यावर थांबून

दुःखाच्या हिंदोळ्या उडविणारे 

मातीत जाण्याआधी आपुलकीचा सोहळा हवा...!!


Rate this content
Log in