STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Romance Others

3  

Shrikant Mariba Waghmare

Romance Others

सपान

सपान

1 min
243

गाढ झोपेतल सपान

नजरे आड लपलेल कुंपन

भयाण शांतता रात्रीची पसरली

सपणात माझ्या

स्वर्गाची अफसरा जणू अवतरली

गालावर नक्षत्राची कोरीव खळी

नाकात मोत्याची साजूक मासोळी

नृत्यास साथ पैंजनाची छन छन करी

सुरेल अवाजाची जणू नभातली कोकिळी

सपणात माझ्या

स्वर्गाची अफसरा जणू अवतरली

हतामंदी मोगऱ्याचा गजरा माळूनी

तालावर तिच्या ठेका धरला मण हरपूनी

अमृताचा प्याला ओठाशी जसा मोह जवळूनी

काळ्याकुट्ट अंधारातल सपान सुंदरता नाही तिची लपवूनी

सपनात माझ्या स्वर्गाची अप्सरा जणू अवतरली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance