STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Abstract

4  

Shrikant Mariba Waghmare

Abstract

बुवा..

बुवा..

1 min
248

कोरोनाच्या महामारीत अख्ख देश थांबलय बुवा .

Vaccine च्या शोधात अख्ख विश्व दमलय बुवा.

दिवसेंदिवस अजूनही लॉक डाऊन वाढतय बुवा.


भविष्याची घालमेल,

गरीबीचा चिमटा बाबाला 

शिक्षण केल्याचा वस्का लेकाला

परक्याची ती सून चिंता खाते लेकीला

मुलामुलींची स्वप्न भलतेच वेशीला टांगुन

वयाचा दाखला बघत इथे बेरोजगारी रडतोय बुवा,


देखाव्याचा पसारा,.

श्रीमंतीचा माज कसला रे तुला

Quality च खान तुझं,

Quality च पिन तुझ ,

Quality च लेन तुझ,

Brand तुझ शेवटी 4-5 फुटाच्या 

कपड्यात गुंडाळलेल दिसतंय बुवा,


जिवाचा धीर,

कोण नाही जिवाचा काळीज 

कोण नाही आपल्या देहाचा मालिक 

बनतोय का आज कुणाचा आधारस्तंभ कोणी ?

जिकडे तिकडे लपलेले भामटे मुखवटे 

मरणाच्या उंबऱ्याशी social media 

वर भावपूर्ण श्रद्धांजली ,RIP

अस काही लिहून मोकळे होतात बुवा,


संयमाचा काडा, 

कोण कुणाचा आता आहे का?

भाऊ नाही, बहिण नाही ,मायबाप नाही.

बातम्या मध्ये हॉस्पिटलची दशा आता बघवत नाही

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे" भारत "आमची" माय "

खंबीर आजूनही लढतेय बुवा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract