कधी कधी!!!
कधी कधी!!!
1 min
389
स्वप्नांचा पाठलाग पूर्ण करताना
रात्री जागा राहतो कधीकधी
सूर्यासोबत मनसोक्त फिरताना
सावली बाजूला ठेवतो कधीकधी
सुखाचे मौल्यवान क्षण वेचताना
आसवे दुःखाची चाळतो कधीकधी
जखम भरून येत असताना
मोरपिसारा फिरवतो कधाकधी
विसर पडला जरी त्या खडतर मार्गाचा
आठवणींना जागं करतो कधीकधी
समुद्राच्या लाटेचा स्पर्श
पहाटेच्या पडलेल्या दवबिंदूत शोधतो कधीकधी..
