प्रणय गीत
प्रणय गीत


प्रणयाच्या गीताचे आपण
सूर, ताल, अन संगीत होऊ
ओठांवर गुलाबी होउन
चल शब्दांच्या मिठीत न्हाऊ
कवेत घेउन स्मृती संध्या
आठवणींची गाणी गाऊ
त्यातील वेडे प्रेम बहाणे
पुन्हा नव्याने जगून घेऊ
डोळ्यांमधल्या पा-यासंगेच
जरा विरघळू मिठीत दोघे
नको दुरावा जाउ विसरून
स्पंदनात अन घेउ झोके
तुझ्या माझ्या प्रणयाचे
हे प्रेम तराणे सांगून
फुलले जीवन गीत मनी
गुणगुण रोज आपण गाऊ
तुझ्या बाहूपाशात अडकून
ऊब , विसावा घेत राहू
भावनांचे विश्व भारून
देहभान विसरून एकरुप होऊ