STORYMIRROR

Shital Yadav

Romance

4  

Shital Yadav

Romance

माहेर

माहेर

1 min
28.2K


माझे माहेर सुंदर

जणू आनंदाची सर

जीव सुखावतो जिथे

असा प्रीतीचा सागर


गेले बालपण तिथे

आता आठवणी उरे

होता स्मरण गावाचे

माझे मन गहिवरे


आई माझी साधीभोळी

माया लावे जीवापरी

लळा बाबांचाच असे

आम्हा सर्व लेकींवरी


लेक लाडकी मी त्यांची

आता दूर देशी आली

सासरच्या गोकुळात

नाती मायेची जुळली


ओढ लागे माहेराची

तसा शीळ घाली वारा

माळरानी खळाळतो

जसा चैतन्याचा झरा


वाट पाहते भावाची

राखी पुनवेचा सण

चित्त माहेराकडे गं

येता महिना श्रावण


भाऊराया माझा असा

कणा जसा जीवनाचा

उभा जिद्दीने पाठीशी

करी नाश संकटांचा


आठवांची ही शिदोरी

जणू अमूल्य दागिना

मोल अशा माहेराचे

खजिन्याला गं येईना


असो कितीही दूर मी

देवापुढे ही प्रार्थना

सौख्य नांदो दोन्ही घरी

ठेव सुखात सर्वांना


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Romance