STORYMIRROR

Shital Yadav

Others

4  

Shital Yadav

Others

बाप माझा शेतकरी

बाप माझा शेतकरी

1 min
348

साऱ्या जगाचा पोशिंदा

खातो कष्टाची भाकरी

अभिमान वाटे जीवा

बाप माझा शेतकरी


असो ऊन वा पाऊस

झेले दोन्ही अंगावरी

दाना-दाना पेरुनिया

पीक येई सोन्यापरी


येता पावसाची सर

रात्रंदिन ध्यास धरी

राबे शिवारात असा

पाणी रक्ताचे तो करी


जपे लेकरा सारखे

चिंता कधीच न सरी

येता अंकुर बियांना

पाहे त्यातच श्रीहरी


पीक होता डौलदार

भासे शेती भरजरी

फळ कष्टाचेच मिळे

कर्म हेचि अष्टौप्रहरी


असे कणा भारताचा

शेती आणि शेतकरी

श्वास कृषि जगताचा

ठेवे शेतीला अंतरी



साहित्याला गुण द्या
लॉग इन