STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational Others

3  

Shital Yadav

Inspirational Others

जीवन गाणे

जीवन गाणे

1 min
355

हसऱ्या फुलांसारखे आयुष्य हे सुंदर जगावे 

सद्गुणांच्या गंध रुपाने आसमंती दरवळावे


नाही गती कर्माविना मानवी या आयुष्याला 

कुंचल्याने कष्टाच्या स्वप्नी सारेच रंग भरावे 


चटका लावणारी मना असते व्यथा कुणाची

पुसूनी आसवे त्यांना जगण्याचे बळ हे द्यावे 


वैरी नको कुणीही आयुष्य असे चार दिवसांचे

अपुलीच सारी नाती सकलांना प्रेम देत जावे 


हुरहूर वाटावी प्रत्येकाला गेल्यावर जगातूनी 

कर्तव्यानेच अपुल्या जिवंत क्षणोक्षणी रहावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational