STORYMIRROR

Shital Yadav

Tragedy

3  

Shital Yadav

Tragedy

गोंगाट

गोंगाट

1 min
207

चिंताग्रस्त मनी गोंगाट विचारांचा घोळतो 

खळगी पोटाची भरण्या जीव हा जाळतो 


मारली पावसाने दडी कशी भेगाळली भुई

पाणी रक्ताचे करुन धारा घामाच्या गाळतो


लक्ष्मी होती माय झाली ही लंकेची पार्वती 

काही उरले नाही फुले आसवांची माळतो 


फायदे सारे गरीबास मिळे फक्त कागदावरी  

कायदे शासनाचे नावापुरतेच जो तो पाळतो 


पाश वाढे सावकारी नसे गरजांना अंत हा 

उद्याच्या नवआशेने रोज मरणाला टाळतो 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy