STORYMIRROR

Shital Yadav

Abstract

4  

Shital Yadav

Abstract

माझ्या मना

माझ्या मना

1 min
592

माझ्या मना बन तू दगड आता तरी

सोडू नको आशा अंत झाला जरी


देण्यातले सुख हे नसे घेण्यात रे

सोसून घावांना दगड बनला हरी


होतील सार्थक साऱ्याच इच्छा तुझ्या

होऊन फूल तू दरवळ सुगंधापरी


आजन्म बंधक नात्यात असतो जगी 

सरणावरच होते सुटका अशी खरी 


कर्माविना नाही माणसाला गती 

शोधून सापडतो देव हा अंतरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract