आठवांची पेटी
आठवांची पेटी
1 min
202
उघडता आठवांची पेटी मन भरून येते
अलगदच आसवांनी देहाला भिजून देते
कुणाला दोष द्यावा सारे जवळचेच माझे
नको खोटारडे नाते जे मज छळून जाते
सुखाची साथ काही क्षणाचीच कापरासम
दुख खऱ्या जीवनाच्या अर्था समजवून देते
नसावी लालसा ही कुठल्याही प्रकारची रे
अती तेथे सदा त्याची माती बनून जाते
मरण हे लागलेले सकलांच्याच जीवनाला
सद्गुणच शेवटी उरती हेचि शिकवून देते
