STORYMIRROR

Shital Yadav

Others

3  

Shital Yadav

Others

मलाच का?

मलाच का?

1 min
280

सुखं सारीच हवीत

दुःख नको मानवाला

दिली कापून जंगले

दोष देतो निसर्गाला


पेटे वैशाख वणवा 

धरा ही होरपळली 

पीडा ही धरणीची 

कुणालाच ना कळली 


विचारतो निसर्ग हा 

दैना घोर मलाच का 

देतो सर्वस्व तुम्हाला 

तरी अशी उपेक्षा का 


एका हाताने द्यावे ते 

दान दुसऱ्या न कळे 

कष्ट केल्यामुळे बघ 

फुलतात शेत-मळे 


ठेवा जाण निसर्गाची 

वृक्ष देती आशीर्वाद 

धन-धान्य येई घरी 

मिळे सौख्याचा प्रसाद 


Rate this content
Log in