STORYMIRROR

Shital Yadav

Classics

4  

Shital Yadav

Classics

देवा अंत नको पाहू

देवा अंत नको पाहू

1 min
840

व्याकूळले तुजविना 

देवा अंत नको पाहू

विठ्ठलाचे वारकरी 

भक्ती सागरात वाहू 


मुखी तुझे नाम घेता 

होई सार्थकी जीवन

तूच माऊली जगाची 

रमे ध्यानात हे मन 


मूर्ती ही शांत सावळी 

देई आत्म समाधान 

मिळे सकल भक्तांना 

सदा सौख्य वरदान 


देवा तुझिया चरणी 

माथा आम्ही टेकवितो 

होवो कल्याण सर्वांचे 

हेचि मागणे मागतो 


येतो कंठ हा दाटून 

देवा अंत नको पाहू 

आता घेऊनी दर्शन 

गुण्यागोविंदाने राहू 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics