STORYMIRROR

Shila Ambhure

Classics

4  

Shila Ambhure

Classics

चित्रचारोळी

चित्रचारोळी

1 min
28.9K




घेतलीस नाना रुपे

अंबे तू गं भक्तांसाठी.

रूप तुझे वृद्धा एक

भीक मागे पोटासाठी.


मूर्तीचा बघुनि थाटमाट

भक्तांचे हरपले देहभान

तिथे भीक मागते माऊली

ना पाहिले वळवुनि मान.


नैवेद्याची ताटे तुज

परी तू एक ना खाशी

भक्त तुझी मी माऊली

का गं ठेविले उपाशी?


भुकेली, दीन माऊली

इथे ना दिसते कुणा

चरणांशी निर्जीव त्या

पैसे का ठेविता पुन्हा?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics