शिरीष
शिरीष
पोपटी छटेच्या
रंगात माखूनि .
कोवळ्या पालवीचा
साज हा लेऊनि .
दिमाखात उभा
शिरीष अंगणी.
सुखावते छाया
गारवा नयनी
सुमने जयाची
आली हो फुलूनी .
सुगंध तयांचा
घालितो मोहिनी .
अशीच सावली
असावी जीवनी.
नको वृक्षतोड
ही एक मागणी.
--------------------
साद
