सोबत
सोबत
ती नको असलेली भयाण शांतता
झोप नसलेले लुकलुकनारे डोळे,
तेव्हा वाटतं तु जवळ असावा,
ही नको असलेली गर्दी
या गर्दीतही स्वतःला एकटं वाटत,
तेव्हा वाटत तु जवळ असावा,
मी एकटी आणी माझी भावना शुन्य,
माझी किंमत शुन्य करण्याऱ्या जगात,
तेव्हा वाटतं तु जवळ असावा,
मन भरून यावं आणी
सागराला उधाण यावं,
तेव्हा वाटतं तु जवळ असावा,
न राहुन लेखणी हातात यावी
शब्द शब्दाची माळ तयार व्हावी,
तेव्हा वाटतं तु जवळ असावा,

