इशारे
इशारे
मजकडे पाहून सख्या रे, का
छळतोस असा
तोडून बंध सारे दूर जाताना, का
वळतोस असा
संगत तुटता सागराची, जलाविना
व्याकुळला मासा
फुंकुनी उरातले निखारे, का
पोळतोस असा
मी रेखिलेले चित्र मनात, मजवरी
हसतोस कैसा
नभ कोसळले अंगावर देईल, कोण
जीवाचा भरवसा असा

