दादा
दादा


दादा,
माझा हात तुझ्या हातात
असाच राहू दे,
आयुष्याच्या कठोर वळणावर
कठोरातील कठोर वाट असू दे...
दादा,
माझा हात तुझ्या हातात
असाच राहू दे,
माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाला
तुझीच साथ असू दे...
दादा,
माझा हात तुझ्या हातात
असाच राहू दे,
राखीच्या प्रत्येक धाग्यात
तुझं प्रेम वाहू दे...
दादा,
माझा हात तुझ्या हातात
असाच राहू दे,
बांधते दादा मायेने राखी
दीप सारे उजळून दे...
दादा,
माझा हात तुझ्या हातात
असाच राहू दे,
अशीच फुलावी प्रीत आपली
हळवी रेशीमगाठ होऊ दे...
दादा,
माझा हात तुझ्या हातात
असाच राहू दे,
हरवू नको दादा मला
प्रेम सारं साठू दे...
दादा,
माझा हात तुझ्या हातात
असाच राहू दे,
असला जरी दूर दादा
मी तुझी ताई, हा विश्वास कायम असू दे...
दादा,
माझा हात तुझ्या हातात
असाच राहू दे...