मनधरणी
मनधरणी
दुःखाचं काय ते ही बेगानं,
येऊन त्यानं मला बरोबर गाठावं,
दुःखानं यावं आणि सारीपाट खेळावं,
राजानं राणीला रोजच तरसावं,
मग अचानकच यावं,
आयुष्याचं मौन,
राणीनं अलगद सांडावं,
डोळ्यांनी मग आभाळ होऊन बरसावं,
उसवल्या जखमांना पुन्हा शिवुन टाकावं,
आयुष्याचं दुःख एका क्षणात नाहीसं व्हावं,
राजाला पाहून राणीनं जगून उठावं,
असंच राणीचं प्रेम फुलावं,
असंच राणीचं प्रेम फुलावं...
