प्रेमगीत
प्रेमगीत
शांत तो किनारा
साथ त्याला चंद्राची,
या संध्यासमयी
आठवण तुझ्या प्रीतीची,
आकाशातल्या चंद्राला,
उपमा देऊ कशाची,
तो शांत मीही शांत,
वेळ आपल्या मिलनाची,
हवा मंद पारिजात धुंद,
कोयल गाते गाणी,
तुझ्या माझ्या प्रीतीला
वाराही वाहतो दमानी,
एक राजा एक राणी,
साद घालीत एकमेकां,
प्रेम कहाणी जन्मली
साक्ष झाले पानोपानी...

