अपेक्षा
अपेक्षा
तु फक्त प्रेम दे रे,
बघ मग ,
नाही प्राण दिला तर बघ,
साराच जीव ओवाळून टाकेल,
तुझा इगो ,
तुझा चिडचिडा स्वभाव,
संताप,
तुझा राग,
नाही गेला तर बघचं,
तु फक्त प्रेम दे रे,
बघ मग ,
तु लटका राग करत रहा,
मी समजुत काढत राहीन,
तुला जवळ घेत राहील,
सारा जीव ओवाळुन टाकीन,
तु फक्त प्रेम दे रे,
कधी कधी एकटं पाडणार नाही,
कधीच हरवु देणार नाही,
कधी गोधळू देणार नाही,
तु फक्त प्रेम दे रे,
तु माझा राजा राहशील,
मी तुझी राणी राहील,
आपला नवा इतिहास राहील,
आपली नवी कहाणी राहीन,
तु फक्त प्रेम दे रे,

