प्रीतपालवी (प्रेम)
प्रीतपालवी (प्रेम)
हळुवार तुझा शिरकाव
आयुष्यात माझ्या झाला
पानाआड दडलेल्या कळीला
फुलाचा साक्षात्कार झाला
वाऱ्यावर झुलताना
प्रीतीची झिंग चढली
तुझ्या सोबतीत स्पर्शाने
हृदयाची आवर्तने वाढली
अलवार तुझा स्पर्श
मोहरून टाकी मजला
मिठीत येता तुझ्या
प्रीतीचा हर्ष समजला
बहरतेय प्रीत आपुली
उत्साह मनी संचारला
तुझ्या अनामिक विश्वासावर
स्वर्ग जीवनात अवतरला

