STORYMIRROR

UMA PATIL

Romance

3  

UMA PATIL

Romance

प्रेमाक्षरं...

प्रेमाक्षरं...

1 min
10.4K


तव अधरांवरील अधर माझे तसेच राहू दे...

अन् त्याच चुंबनाच्या गोडीत मला डुंबून जाऊ दे...


तशीच राहू देत तुझ्यातील मोहकता बहरलेली...

अन् त्याच रम्यतेत मला रमून जाऊ दे...


तसेच राहू देत सर्व रंग तू माझ्यावर उधळलेले...

अन् त्यांच्यातच मला रंगवून टाक...


सोडून जा तू माझ्याकडे फक्त,

मी व्यक्त केलेला राग तुझ्यावरचा...


मी केलेल्या माझ्या चुका

माझ्याकडेच असू देत...


मी पाठवलेल्या फुलांच्या पाकळ्या

तुझ्याकडे तशाच राहू देत...


राहू देत ते क्षण तुझ्याकडेच

तू माझ्याबरोबर घालविलेले...


तशाच राहू देत पाऊलवाटेवरच्या तुझ्या खुणा...


अन् राहू दे तशीच समुद्री वाळूवर

तू कोरलेली आपली प्रेमाक्षरं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance