थोडीशी ..मनातली
थोडीशी ..मनातली
आज मला सगळ जुनं आठवतेय,
तुझं ते वाट बघायला लावणं, उशिरा येऊनही ते हसणं,
माझं ते उगाचचं रागावणं, पण पुन्हा आपला एकत्र येणं.
आज मला सगळ जुनं आठवतेय,
ते तुझं रुसणं, उठून निघून जाणं,
पण जाताना मागे वळून मी बोलावतो आहे का ते पाहणं.
आज मला सगळ जुनं आठवतेय,
माझ्या प्रत्येक क्षणात बरोबर असण ,मला समजून घेणं,
माझ्या सुखात बरोबर असणं, दुःखातही साथ देणं.
आज मला सगळ जुनं आठवतेय,
ते तू मला फुल देणं, "मी परत येते " हे सांगणं,
मी तुझी वाट पाहणं, पण तू कधीच परत न येणं.
आज मला सगळ जुनं आठवतेय,
तू अशीच अकाली निघून जाण, माझं वेड्यासारखं तुला शोधणं,
तू आलीस, तू येणार..... हे स्वतःच मनाला समजावणं.
पण............. पण आता भूतकाळात जगत आहे,
जुन्या आठवणी वेचत आहे,
तू येणार नाही तरी तुझी वाट बघत आहे,
त्याच आठवणी पुन्हा पुन्हा काढत आहे,
त्यांना विसरण्याचा प्रयत्न करतोय.
पण ................. अजूनही मला सगळं, सगळ जुनं आठवतेय....

