मी अनुभवलेला पाऊस - भाग एक
मी अनुभवलेला पाऊस - भाग एक
आतुरता त्याचीच असताना,
मुक्त तो बरसला,
आलिंगन देऊन गेला,
आसुसलेल्या वसुधेला ॥
आज पुन्हा निळाई,
आकाशात रंग घेई,
दवबिंदू पानांवरती,
मोती बनून राही ॥
दवबिंदू हे टिपताना,
चाहूल तुझी नसताना,
मनात मागणे एक,
तू साद धरणीची ऐक॥

