STORYMIRROR

Aarti Shirodkar

Romance Classics

4  

Aarti Shirodkar

Romance Classics

मी अनुभवलेला पाऊस - भाग तीन

मी अनुभवलेला पाऊस - भाग तीन

1 min
369

अचानक तो आला, संततधार होऊन,

रुद्रावतार त्याने धारण केला, 

मुसळधार बरसून ॥


पावसासाठी आणा भाका घालणारे मग,

पाऊस पडू नये म्हणून धावा करतात,

नद्या नाले स्वमार्ग सोडून,

रस्त्यावर धावू पाहतात ॥


पाहता पाहता पाणी, चहूकडे साचते,

सुरळीत असलेले जनजीवन, 

विस्कळीत होवून जाते ॥


हवाहवासा वाटणारा पाऊस,

नकोसा वाटू लागतो,

कारण पोटा पाण्यासाठी,

जीव तडफडू लागतो ॥


निसर्गासमोर माणूस,

मग नतमस्तक होवून जातो,

कारण विज्ञान कितीही पुढे गेलं,

तरी निसर्गच बाप असतो ॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance