जपायचंय तुला...
जपायचंय तुला...
1 min
113
जपायचंय तुला, घडवायचंय तुला,
या स्पर्धेच्या जगात, सशक्त बनवायचंय तुला.
इथे आहे ना, सगळीच स्पर्धा आहे,
उत्तम पालकत्वाची, उत्तम संस्कारांची.
नाही व्हायचंय आम्हाला या गर्दीत सामील
तू हो ना मोठी, तुला हवी तशी,
आम्ही आहोत ना तुझ्यासवे, तुझे मार्गस्थ बनून.
नाही बनायचंय आम्हाला तुझ्या संकटांची ढाल,
बघायचंय आम्हाला तुला ढाल बनताना,
कारण आई वडील म्हणून,
जपायचंय तुला, घडवायचंय तुला,
या ढोंगी जगात सशक्त बनवायचंय तुला.
